'काँग्रेसच्या काळात जवानांचे शिरच्छेद, आम्ही पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांना उडवलं'

शिमला : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा ) यांनी आज (मंगळवार) हिमाचल प्रदेशातील भाजपच्या (BJP) निवडणूक प्रचाराची धुरा हाती घेतली. शहांनी चंबा जिल्ह्यातील भाटिया विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार विक्रम जरियाल यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केलं.'भारत माता की जय' या घोषणेनं आपल्या भाषणाची सुरुवात करताना अमित शहा म्हणाले, 'येथून (भाटिया मतदारसंघ) सलग तिसऱ्यांदा विक्रम जरियाल यांना विजयी करण्यासाठी मी आपले आशीर्वाद घेण्याकरिता इथं (भाटिया) जनतेकडं आलोय. या देवभूमी हिमाचलला माझा सलाम आहे. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी ज्यांचे पुत्र आपल्या प्राणांची आहुती देण्यापासून मागं हटत नाहीत, त्या शूर मातांनाही माझा सलाम आहे. आपल्या सैन्यात हिमाचलमधील सैनिकांची टक्केवारी सर्वाधिक आहे. यावेळी शहांनी मणिमहेश, कार्तिक स्वामी आणि नाग मंदोर यांचा आशीर्वाद घेत जरियाल यांचा विजय निश्चित असल्याचं म्हटलं.

'काँग्रेस नेते टोपीचं राजकारण करताहेत'

केंद्रीय गृहमंत्र्यांनी हिमाचल प्रदेशातील जनतेला सांगितलं की, 'आता नवीन प्रथा सुरु करा आणि पुन्हा एकदा भाजपचं सरकार आणा. काँग्रेस नेते टोपीचं राजकारण करताहेत. पण, आजपासून लाल टोपीही भाजपची आणि हिरवी टोपीही! राहुलबाबा.. कान उघडे ठेवून ऐका, हिमाचल प्रदेशचा प्रत्येक भाग भाजपचा आहे. दिल्ली आणि हिमाचलमध्ये काँग्रेस माता-पुत्राचा पक्ष आहे. पण, भाजप हा सर्वांचा पक्ष आहे. काँग्रेस सरकारनं हिमाचल प्रदेशचं बजेट 90-10 वरून 60-40 पर्यंत कमी केलं होतं. मात्र, भाजपनं पुन्हा 90-10 करत राज्याचा विकास करून घेतला. आता लोकशाहीत राजा-राणीचं नव्हे तर जनतेचं राज्य चालतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या काळात जवानांचे शिरच्छेद करण्यात आले. मात्र, आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना उडवलं, असं टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने