भाईजाननंतर आता शहेनशहाला 'X' दर्जाची सुरक्षा, कारण?

मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांना यापुढील काळात एक्स दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी अमिताभ यांना केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे काल मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले होते.काही दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. याशिवाय बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्यांना सातत्यानं मिळणाऱ्या धमक्या यामुळे मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. अमिताभ हे बॉलीवूड विश्वातील मोठे सेलिब्रेटी आहे. त्यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्या नावाभोवती असणारे वलय याचा विचार करुन हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे.

कुणाला सुरक्षा द्यायची आणि कुणाला नाही याचा निर्णय इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडून घेतला जातो. त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार संबंधित व्यक्तीच्याबाबत अहवाल सादर केला जातो. त्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे हा मुद्दा देखील यावेळी विचारात घेतला जातो. अमिताभ यांच्यापूर्वी अक्षय कुमारला देखील एक्स दर्जाची सिक्योरिटी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचारी तीन शिफ्टमध्ये सुरक्षा देण्याचे काम करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने