“एका मुलीच्या चारित्र्यावर…” सुंबुल तौकीरला प्रसिद्ध अभिनेत्याचा पाठिंबा, सलमानवर केली टीका

मुंबई : बिग बॉस १६ ची सर्वात लहान स्पर्धक म्हणून ओळखली जाणारी सुंबुल तौकीर या शोमध्ये सहभागी झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. सुंबुलने तिचे वडील आणि सलमान खानचा सल्ला न मानता शालीनबरोबर ठेवलेली मैत्री तिच्या चाहत्यांना खटकली. शालीनसाठी सुंबुलचं पजेसिव्ह असणं अनेकासाठी धक्कादायक होतं कारण शालीन मात्र वारंवार त्यांची मैत्री नाकारताना किंवा सुंबुलला दोष देताना दिसत आहे. सातत्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या सुंबुलला तिचा मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता मनस्वी वशिष्ठने मात्र पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर त्याने होस्ट सलमान खानवर टीका केली आहे.सुंबुलचा मित्र मनस्वी वशिष्ठने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट लिहून सुंबुलला पाठिंबा दिला आहे. त्याच्यामते सुंबुलला विनाकारण टार्गेट केलं जात आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “नॅशनल टेलिव्हिजनवर एका साध्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाताना पाहून दुःख होतंय. मी सुंबुलबरोबर काम केलं आहे. तू खूपच संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. मी बिग बॉसचा यंदाचा सीझन पाहतोय आणि सर्वजण सातत्याने ज्या प्रकारे तिच्या चारित्र्यावर बोलत आहेत ते पाहून मला खूप दुःख होतंय. घरातील एकही सदस्य सुंबुलच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेला नाही.”आपल्या पोस्टमध्ये मनस्वीने पुढे लिहिलं, “हे खूपच वाईट आहे. जर तुम्ही लोकांना संदेश देता की एक मुलगी जर एखाद्या गोष्टीला नकार देत असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी नाही बोलत असेल तर त्याचा अर्थ नाही असाच होतो. तर मग तुम्ही सगळे एका मुलीवर ती एका पुरुषाच्या प्रेमात आहे किंवा त्याच्यासाठी वेडी आहे असे आरोप का लावत आहात? कारण सुंबुलने ही गोष्ट कधीच स्वतःहून बोललेली नाही. मग सुंबुलवर हा अन्याय का होत आहे? तिचं चारित्र्य वाईट आहे असं तुम्हाला का वाटतं? हे खूपच वाईट आहे.”दरम्यान मनस्वी वशिष्ठने सुंबुलबरोबर ‘इमली’ या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत त्याने आदित्य कुमार त्रिपाठीची भूमिका साकारली होती. आपल्या पोस्टमध्ये मनस्वीने अप्रत्यक्षपणे सलमान खानवरही टीका केली आहे. कारण ‘विकेंड का वार’मध्ये सलमाननेच शालीन भानोतसाठी सुंबुल जास्त पजेसिव्ह आहे असं म्हणत तिला खूप सुनावलं होतं. तसंच शालीनपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. याशिवाय मनस्वीने या पोस्टमधून शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यावरही टीका केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने