शरीरावर जखमा, शर्टवर रक्त…रणबीर कपूरचे फोटो पाहून चाहते काळजीत

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश होतो. रणबीर कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि आता तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे.गेले अनेक महिने तो ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची बरेच दिवस चर्चा आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याच्या शरीरावर जखमा दिसत असून त्याच्या शर्टला रक्त लागलेलं दिसत आहे. रणबीरचा हा फोटो समोर येताच त्याचे चाहते अस्वस्थ झाले असून या फोटोंमागील सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.रणबीर कपूर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या अ ॅक्शन सीनचे शूटिंग करत होता. त्यामुळे त्या सीनसाठी त्याला तसा मेकअप करण्यात आला होता आणि त्याच्या शर्टवर रक्त दिसत होते. रणबीर कपूरचा रक्ताने माखलेला फोटो पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि ते अस्वस्थ होत आहेत. पण काळजीचे काहीही कारण नाही. रणबीरला कसलीही दुखापत झालेली नाही.रणबीर कपूर लवकरच ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने