world diabetese day: गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना टीबी, डायबिटीजसह अन्य औषधे होणार स्वस्त

दिल्ली : केंद्र सरकारने टीबी, एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी (NLEM) रविवारी जाहिर करण्यात आली. यामुळे अनेक आजारांवरची औषधे स्वस्त दरात आता उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पेटंट औषधांचाही समावेश आहे.तब्बल सात वर्षानंतर आरोग्य मंत्रालयाने १३ सप्टेंबर रोजी औषधांची यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी 350 हून अधिक तज्ञांनी तयार केली आहे आणि यामध्ये एकूण 384 औषधांचा समावेश आहे. त्यापैकी 4 कॅन्सरविरोधी औषधांसह 34 नवीन औषधे आहेत. तर 26 औषधे यादीमधून वगळण्यात आली आहे. 2015 च्या यादीत 376 औषधांचा समावेश होता.नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा ही औषधे विकली जाऊ शकत नाहीत. कोविड औषधे आणि लस या यादीत समाविष्ट नाहीत कारण त्यांना फक्त आपत्कालीन वापरासाठी परवानगी आहे. यादीतून वगळण्यात आलेल्या औषधांमध्ये रॅनिटिडीन, ब्लीचिंग पावडर, व्हिटॅमिन सप्लिमेंट निकोटीनामाइड यांचा समावेश आहे.

यादीमध्ये समाविष्ट असणारी औषध

  • मधुमेहविरोधी औषधे उदा. टेनेलिग्लिप्टीन, इन्सुलिन ग्लेर्जिन इंजेक्शन.

  • एंटीबायोटिक्स उदा. मेरोपेनेम, सेफुरोक्साईम.

  • सामान्य वेदना कमी करणारी औषधे आणि इतर औषधे जसे की मॉर्फिन, इबुप्रोफेन, डायक्लोफेनाक, पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, प्रेडनिसोलोन, सापाच्या विषावरील औषध, कार्बामाझेपिन, अल्बेंडाझोल, इव्हरमेक्टिन, सेटीरिझिन, अमोक्सिसिलिन

  • व्यसनमुक्ती औषधे जसे की बुप्रेनॉर्फिन, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी

  • पेटंट औषधे जसे की अँटी-टीबी ड्रग बेडाक्विलिन आणि डेलामॅनिड, अँटी एचआयव्ही डोलुटेग्रावीर, अँटी हेपेटायटीस सी डक्लाटासवीर

  • हृदयविकार आणि स्ट्रोकसाठी वापरली जाणारी औषध

  • भारतात विकसीत झालेली रोटाव्हायरस लस

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने