"हे म्हणजे ना मला पिकनिकला आल्यासारखं वाटतं", अपुर्वाचा टोमणा कुणाला?

मुंबई :  बिग बॉस मराठीच्या घरात सध्या टास्कवरुन वाद रंगताना दिसत आहेत. सदस्यांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जायचे प्रमाण वाढताना दिसत आहे. फक्त मारामारीच काय ती व्हायची शिल्लक आहे. दोन्ही गट आपापली रणनीती आखून टास्क दरम्यान डाव खेळताना दिसत आहेत. अशातच आता अपूर्वा नेमळेकर आणि टीम दरम्यान रंगलेला एक संवाद पुढील भागात चर्चेचा विषय ठरणार असं दिसत आहे. अपूर्वानं या संवादातून घरातील एका सदस्याला टोमणा मारला आहे. चला याविषयी जाणून घेऊया सविस्तर.बिग बॉसच्या घरामध्ये सध्या अपूर्वा,अक्षय आणि त्रिशुलमध्ये टास्कबद्दल जबरदस्त चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये अपूर्वाचं म्हणणं आहे की,''मी पहिल्यापासून सांगत होते पहिल्यांदा अक्षय,रोहितला उतरवूया,नंतर तुम्ही दोघं उतरा...पण ही देशमुख अडून होती..कायम फर्स्ट रहाचंय असं का असतं हिचं मध्ये-मध्ये? कालपण माझी चिडचिड म्हणूनच झाली''.पुढे अपूर्वा म्हणाली,''कालपण मी जेव्हा बोलले की मी सेकंड किंवा थर्डला जाणार तेव्हा पण हिचं होतं मग मी काय करू? हे म्हणजे मला पिकनिकला आल्यासारखं वाटत आहे. दरवेळेला हिचा नंबर नाही आला तर रुसुन रोहितकडे बघते. अक्षय यावर काहीतरी मत मांडतो पण रोहित यावर काहीच बोलत नाही''. आता इथे पिकनिकचा हा जो टोमणा अपूर्वानं मारलाय तो नेमका कुणाला मारलाय हे आजच्या भागात कळेलच. कारण नक्कीच पुढील संभाषण पाहिलं तर हा टोमणा अमृता देशमुखला नाही.आपल्या मनात रोहीतविषयी आदर आहे हे सांगायला मात्र अपूर्वा यावेळी विसरली नाही. 

पुढे नमूद करत ती म्हणाली,''रोहित टिपिकल बॉयफ्रेंड म्हणून इथे वावरताना दिसत नाही. कारण त्याला माहित आहे,तो जर काही बोलला तर त्याला सगळेच नडणार''.आता बघायचं ही चर्चा अजून किती रंगते. पुढे काय घडते? हे जाणून घेण्यासाठी पहात रहा बिग बॉस मराठी सिझन ४.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने