“शिव ठाकरेला माफ करणं, ही माझी चूक होती”

मुंबई : सध्या बिग बॉस १६ चांगलंच गाजतंय. बिग बॉसच्या घरामध्ये नुकताच शिव ठाकरे व अर्चना गौतम यांच्यामध्ये तुफान राडा झाला. साजिद खान व गौरी नागोरीचं भांडण सुरु असताना शिवने या वादात उडी घेतली. हे भांडण सुरु असताना शिवनंतर अर्चनानेही साजिद-गौरीच्या भांडणामध्ये भाग घेतला. या वादादरम्यान शिव अर्चनाच्या बराच जवळ आला. म्हणूनच अर्चनाने त्याचा चक्क गळा पकडला. याची शिक्षा म्हणून बिग बॉसने अर्चना गौतमला घरातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता मराठी अभिनेता आणि बिग बॉस मराठी २ चा स्पर्धक आरोह वेलणकरने केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.अर्चना गौतमने शिव ठाकरेचा गळा पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर बिग बॉसने शिक्षा म्हणून अर्चनाला बाहेर काढलं. पण त्यानंतर बिग बॉस मराठी २ च्या आठवणींना उजाळा देत मराठी अभिनेता आरोह वेलणकरने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने ‘शिव ठाकरेला माफ करणं ही माझी चूक होती’ असं म्हटलं आहे. आरोह वेलणकरचं हे ट्वीट सध्या बरंच चर्चेत आलं आहे.आरोहने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “मागे वळून पाहताना, शिव ठाकरे माझ्याबरोबरही हिंसक झाला होता. त्याने मला मारलं होतं. मला वाटलं होतं की त्याच्या वर्तणूकीसाठी बिग बॉस त्याला घरातून बाहेर काढतील पण असं घडलं नाही. मी त्याला माफ करायला नको होतं. शिव ठाकरेला माफ करणं ही माझी चूक होती. मी सुद्धा त्याच्याशी तसंच वागायला हवं होतं.” आरोह वेलणकरने या ट्वीटमधून बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची आठवण करून दिली होती. ज्यात आरोह आणि शिव सहभागी झाले होते आणि त्यावेळी त्यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. याच भांडणात शिवने आपल्यावर हात उचलल्याचं आरोहचं म्हणणं आहे.

दरम्यान अर्चनाने शिव ठाकरेचा गळा पकडल्या प्रकरणी शिव ठाकरेच्या बहिणीने प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, “मला काल रात्री बिग बॉसच्या घरात शारीरिक हिंसाचार झाल्याची घटना घडली, हे मला कळले. यात शिव सहभागी होता, हे देखील मी पाहिले. पण ही घटना घडायला नको होती. तिची ही कृती पूर्णपणे अनावश्यक होती. तुला बोलायचं तेवढं बोल, पण कुणावर हात उचलायची गरज नव्हती. तिने जे केले ते पूर्णपणे चुकीचे होते. मला आनंद आहे की शिवने तिला तिच्यासारखीच प्रतिक्रिया दिलेली नाही.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने