जेलमध्ये बापूचं दहावं वर्ष; भक्त म्हणतायेत 'आता तरी सोडा'

दिल्ली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू यांना ३१ ऑगस्ट २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना अटक केल्याच्या घटनेला नऊ वर्षे पूर्ण झाले असून दहावे वर्षे लागले आहे. तर आता त्यांच्या भक्तांकडून बापूच्या सुटकेची मागणी केली जात आहे. तर त्यांच्याविरोधात सरकारकडे कोणतेच पुरावे नसल्याचं भक्तांकडून सांगण्यात येतंय.

दरम्यान, "सोज्वळ आसाराम बापूच्या विरोधात कोणतेच पुरावे नसताना त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. १० वर्षे झाले तरी त्यांना अजून न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय मिळायला एवढे दिवस का लागले? आत्ता तरी त्यांची सुटका करा" अशी मागणी आसाराम भक्तांकडून करण्यात येत आहे.आसाराम बापूच्या सुटकेसाठी ३० ऑगस्ट २०२२ रोजी भक्तांकडून पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आताही ट्वीटरवर त्यांच्या सुटकेसाठी मागणी केली जात आहे. आसाराम बापूचा ट्रेंड सध्या ट्वीटरवर होत आहे. त्यामुळे ते आता पुन्हा चर्चेत आले आहेत.
का आहे आसाराम बापू अटकेत?

एका १६ वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याचं सांगून त्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भूतबाधा दूर करतो म्हणून त्या मुलीला एका खोलीत घेऊन जात तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर सदर पीडितेच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन आसाराम यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने