तब्बल २५ वर्षानंतर पॉकेमॉन सीरीजमधला ॲश केचम ठरला वर्ल्ड चॅम्पियन

अमेरिका : 25 वर्षांनंतर, पोकेमॉन ॲनिमे मालिकेतील मुख्य पात्र ॲश केचम अखेर जगज्जेता बनला आहे आणि त्याने जगातील सर्वात महान पोकेमॉन ट्रेनरचा किताब पटकावला आहे. पोकेमॉनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही बातमी शेअर करण्यात आलीय. त्यांनी लिहिले, "त्याने हे केले! ॲश वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे!" नवीन स्टारचे अभिनंदन करणारा व्हिडिओ सोबत. या ट्विटला 4.3 मिलीयन व्ह्यूज आणि 3.6 लाख शेअर मिळाले आहेत.ही एक फिक्शन सीरीज असून "पोकेमॉन अल्टिमेट जर्नीज: द सीरीज" असे या सीरीजचे नाव आहे. ॲश आणि त्याचा पोकेमॉन पार्टनर पिकाचू यांनी शुक्रवारी जपानमध्ये प्रदर्शित झालेल्या भागामध्ये पोकेमॉन वर्ल्ड कॉरोनेशन सीरिजची आठवी स्पर्धा जिंकत सीरीजमध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. सीरीजमधील लढाईत अंतिम लढत ॲश आणि लिओन यांच्यात झाली होती. या सीरीजचे एकूण चार भाग चाललेत. तसेच लेटेस्ट सीझनमध्ये पूर्वीच्या सीझनमधील ब्रॉक, मिस्टी आणि डॉन हे प्रेक्षकांचे आवडते पात्रही दिसून आलेत.
या सीरीजच्या अमेरिकन आवृत्तीतील ॲशसाठी आवाज देणारी अभिनेत्री सारा नॅटोचेनी यांनी ट्विट केले की, "पोकेमॉनच्या या भागाचा इंग्रजी डब जगासोबत शेअर करण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही. ॲश केचमला आवाज देणे हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. तो खरोखरच सर्वोत्कृष्ट आहे त्याच्यासारखा कोणीही नव्हता." ॲश हे कार्टून फिक्शन कॅरेक्टर असलं तरी प्रेक्षकांसाठी हृदयस्पर्शी आहे.पोकेमॉन कंपनी इंटरनॅशनलचे मार्केटिंग उपाध्यक्ष टायटो ओकिउरा यांनी व्हेरायटीला सांगितले की, "25 सीझनमध्ये जगातील अव्वल पोकेमॉन ट्रेनर बनण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी ॲश केचमचा दृढनिश्चय आणि चिकाटी हे दोन गुण ट्रेनर होण्यासाठीचे उत्तम उदाहरण आहे ."

ॲनिम फ्रेंचायझीच्या अनेक चाहत्यांनी ॲश जगातील सर्वोत्कृष्ट पोकेमॉन ट्रेनर बनल्याचा आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव केलाय. एका यूजरने लिहिले, "25 वर्षे! आम्ही या क्षणासाठी 25 वर्षे वाट पाहिली. तर दुसऱ्याने लिहीले, '२५ वर्ष चाललेले हे सगळ्यात बेस्ट फिक्शन..' ही बातमी कळताच प्रेक्षकांचा आनंद द्विगुणती झाला होता. या बातमीची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो असेही प्रेक्षक म्हणाले.टेलिव्हिजनवर हा शो सुरुवातीला व्हिडिओ गेम म्हणून सुरू झाला आणि त्यानंतर त्याचे 1,200 हून अधिक भाग प्रसारित झाले. 1997 पासून, जेव्हा ॲश केचमने त्याच्या 10 व्या वाढदिवसानिमित्त पिकाचू, हसणारी पिवळी गिलहरी पाहिली तेव्हापासून, या सीरीजमध्ये त्याचा पोकेमॉन मास्टर बनण्याचा प्रवास दर्शविला गेला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, 'स्कार्लेट' आणि 'व्हायलेट' नावाचे दोन नवीन पोकेमॉन गेम 18 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने