आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं नाव काय ठेवणार? नीतू कपूर म्हणाल्या…

मुंबई: आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. आलियाने ६ नोव्हेंबरला (रविवारी) एका गोंडस मुलीला जन्म दिला. या सेलिब्रिटी कपलवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर कलाक्षेत्रामधील अनेक मंडळी आलिया-रणबीरला अभिनंदन करत आहेत. या सगळ्यामध्ये रणबीरची आई म्हणजेच अभिनेत्री नीतू कपूर भलत्याच खूश आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देत आपल्याला नात झाली असल्याचा आनंद व्यक्त केला. आता त्यांचा आणखीन एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.आलिया सध्या रुग्णालयामध्ये आहे. नीतू कपूर आपल्या सूनेला तसेच नातीला भेटायला रुग्णालयामध्ये गेल्या होत्या. याचदरम्यान घरी परत येत असताना नीतू यांना पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. यावेळी त्यांनी आलिया-रणबीरच्या लेकीचं नाव काय ठेवणार? याबाबत सांगितलं.पापाराझी छायाचित्रकारांनी नीतू यांना नात कशी आहे? तुम्ही नातीचं नाव काय ठेवणार? असा प्रश्न विचारला. यावेळी त्या म्हणाल्या. “नात अगदी ठिक आहे. तसेच अजूनही आलिया व रणबीरचं नाव काय ठेवणार याबाबत ठरवलेलं नाही.” पण नीतू या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये फारच खूश दिसत आहे.रणबीरने लेकीला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा तो रुग्णालयामध्येच रडू लागला. रणबीरला रडताना पाहून तिथे उपस्थित कुटुंबियांच्या डोळ्यांमध्येही पाणी आलं. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झालं. आता रणबीर सध्या बाबा झाला असल्याचे सुंदर क्षण जगत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने