आलिया-रणबीरनं दिली मुलीच्या नावाची हिंट, ऐकून नीतू कपूरही झाल्या भावूक

मुंबई: नुकतेच आई-बाबा झालेले सेलिब्रिटी कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या आपल्या चिमुकलीसोबत आयुष्याचा नवा आनंद अनुभवत आहेत. छोट्या राजकुमारीच्या येण्यानं दोघांनाही आकाश ठेंगणं झालं आहे. दोघांसाठीही मुलीसोबतचा प्रत्येक क्षण खास असणार हे नक्की. आलिया आणि रणबीरच्या या चिमुकलीतं नाव जाणून घेण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत. काय असेल कपूर कुटुंबियांच्या या प्रिन्सेसचं नाव?आपणही नक्कीच आलिया-रणबीरच्या मुलीचं नाव जाणून घेण्यास उत्सुक असालच,तेव्हा या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे त्याविषयी इथे सांगणार आहोत. लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार कळत आहे की रणबीर-आलियाच्या मुलीचं नाव हे दिवंगत अभिनेते आणि रणबीरचे वडील Rishi Kapoorयांच्या नावाशी साधर्म्य साधणारं असणार आहे. हा निर्णय आलिया आणि रणबीरचा आहे. यानिमित्तानं ते Rishi Kapoor यांना आदरांजली वाहणार आहेत.रणबीर आणि आलियाची ही कल्पना ऐकून नीतू कपूर मात्र भावूक झाल्याचं कळत आहे. त्या आता आपल्या लाडक्या नातीचं नाव संपूर्ण जगाला सांगण्यासाठी खूप उत्सुक आहेत. रणबीर आणि आलियाच्या मुलीच्या जन्मानं त्यांच्यापेक्षा आधिक आई नीतू कपूर खूश आहेत. त्या आपल्या नातीला सगळ्यात क्यूट मुलगी असं देखील म्हणाल्या आहेत.

बातमी आहे की,रणबीर-आलिया सोबत पूर्ण कुटुंब लहानगीचं नाव काय ठेवायचं यासाठी नावांची यादी तयार करतायत. ते लवकरच आपल्या राजकुमारीचं नाव घोषित करतील. अनेक लोकांना असं देखील वाटत आहे की रणबीर-आलिया आजकालचा ट्रेन्ड फॉलो करताना दोघांचे नाव एकत्रित करुन एखादं नाव ठेवतील. पण असं होणार नाही. समोर येतंय की आलिया-रणबीर Rishi Kapoor यांच्या नावावरुन आपल्या मुलीचं नाव ठेवणार आहेत. आता पहायचं रणबीर आणि आलिया नेमकं काय नाव ठेवतायत आपल्या क्युट मुलीचं नाव.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने