"मातोश्रीवरचे खोके.. " पक्ष प्रवेशाच्या घोषणेवेळी दीपाली सय्यदचे रश्मी ठाकरेंवर मोठे आरोप

मुंबई : अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पक्षप्रवेश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्या जात आहेत. येत्या 3 दिवसात अभिनेत्री दीपली सय्यद पक्षात प्रवेश करणार आहेत. त्या बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती घेण्यासाठी मी तयार आहे असंही सय्यद यांनी सांगितलं आहे.त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, मला शिंदे साहेबांनी पक्षात आणलं होतं त्यामुळे मी पक्षात प्रवेश करत आहे. दरम्यान बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांना जी शिक्षा झाली आहे ती त्यांच्या पापाची शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं संजय राऊत उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्यामुळे पक्ष फुटला असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मला शिंदे यांनी सेनेत आणलं होतं त्यामुळं आता मी त्यांच्यासोबत उभं राहणं माझ कर्तव्य आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या की, मुंबई महापालिकेतील खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्यामुळे रश्मी ठाकरे यांना खंत वाटत आहे. त्याचबरोबर नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या सर्व चिल्लर आहेत. या सगळ्यांचा सूत्रधार आहे तो म्हणजे रश्मी वाहिनी आहेत असंही त्या म्हणाल्यात.मोठ्या पातळीवर वाद होतो तेव्हा अशा खोक्याच्या गोष्टी बाहेर येतात. खोके कोण घेतं ते सर्वांना समजलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला महत्व मिळालं पाहिजे. रश्मी ठाकरे या महानगरपालिकेतील मुख्य सूत्रधार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. बोलताना त्यांनी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने