बिपाशाची इच्छा पुर्ण! बिपाशा करणला कन्यारत्नांची प्राप्ती..

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे मागील काही दिवसांपासून बरेच  चर्चेत होते. त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी ते उत्सूक होते. बिपाशा बासूने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. हे स्टार कपल आपल्या मुलीच्या जन्मामुळे खूप आनंदी आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी एक सुंदर परी आली आहे.या जोडप्याने शनिवारी एका मुलीचे आई बाबा झाले. 2016 मध्ये बिपाशा आणि करणचे लग्न झाले होते. लग्नाच्या 6 वर्षानंतर या जोडप्याने आपल्या मुलीचे स्वागत केले आहे. बिपाशा बासूने ऑगस्टमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून या कपलने अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत



बिपाशाने अनेकदा मॅटर्निटी शूट केले आहेत, जेव्हा तिचे फोटो समोर आले, तेव्हा तिला खूप कौतुक मिळाले. तिने तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही महिन्यांपूर्वी बिपाशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला आणि करणला मुलगी हवी आहे. त्याच्या घरी मुलगीचं जन्माला यावी, अशी त्याची इच्छा आहे.आता त्याची ही इच्छा पुर्ण झाली असून त्याच्या घरी आलेल्या या खूशीने नक्कीच बिपाशा आणि करणसोबतच चाहत्यानांही आनंद झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने