ब्लू टिकच्या किंमतीवर झोमॅटोचा आक्षेप

अमेरिका : जगातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले ट्वीटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिकवर पैसे आकारण्याची घोषणा केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. मस्क यांनी Twitter वर Blue Tick ची किंमत 8 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 661 रुपये प्रति महिना आकारण्याचे ठरविले आहे.वेगवेगळ्या देशात 8 डॉलरची किंमत त्यांच्या चलनानुसार वेगवेगळी असू शकते. अशात ब्लू टिकवरील झोमॅटोचं एक ट्वीट सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होतंय.अनेक युजर्सनी इलॉन यांना ब्लू टिक ची किंमत कमी करण्याची मागणी केली आहे. अशीच मागणी Zomato नेही ट्वीट करत इलॉन मस्क यांना ब्लू टिकची किंमत कमी करण्यास सांगितले आहे. सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Zomato ने ट्वीट करत इलॉन मस्कला 8 डॉलरवर 60% डिस्काउंट मागितले आहे. म्हणजेच इलॉन मस्कने ही मागणी जर पूर्ण केली तर Twitter यूजर कडून जवळपास 3 डॉलर म्हणजेच 250 रुपये प्रति महीना ब्लू टिकसाठी आकारण्यात येईल.झोमॅटोचे हे ट्वीट सध्या व्हायरल होत असून या ट्वीटवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सध्या या ट्वीटवर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने