विजयच्या सत्याचा विजय होणार का ? दृष्यम 2 चा उत्कंठावर्धक दुसरा ट्रेलरही समोर…

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी दृष्यम चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्याच्या टीझरचं प्रेक्षकांनी कौतूक केलं होतं. रहस्य,उत्कंठावर्धक आणि पावलोपावली प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारा दृष्यम प्रेक्षकांचे आगामी आकर्षण आहे. त्या दृष्यम 2 चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा वाढवण्यासाठी या चित्रपटाचा दुसरा ट्रेलरही समोर आला आहे. निर्मात्यांनी 'दृश्यम 2' चा नवीन ट्रेलर रिलीज केला आहे, जो पहिल्या ट्रेलरपेक्षा अधिक जबरदस्त आहे.दोन मिनिटे आणि 30 सेकंदांचा हा ट्रेलर बर्‍याच सस्पेन्स आणि थ्रीलमध्ये सुरू होतो. चित्रपटाच्या पहिल्या भागात विजय साळगावकरांचे कुटुंबीय त्यांच्या बोलण्यात पोलिसांना फिरवतात असे दाखवण्यात आले होते त्यानंतर तो पोलिसांसमोर गुन्हाची कबुली देतांना दिसला होता, मात्र दुसऱ्या भागात असे होईल की नाही हा प्रश्न आहे. समोर आलेला नवीन ट्रेलरमध्ये अजय देवगण रात्री जमिनीत एक गोणी गाडून आणि नंतर बांधलेल्या इमारतीतून बाहेर पडण्यापासून सुरू होतो.यानंतर विजय साळगावकर यांचे कुटुंब पुन्हा एकदा खून प्रकरणाच्या तपासात कसे अडकते, पोलिस त्यांचा कसा छळ करतात. त्यांच्याकडून सत्य काढून घेण्यासाठी कोणत्याही थराला जातांना दिसतात. पहिल्या ट्रेलरच्या शेवटी अजय देवगण आपला गुन्हा कबूल करतो असे दाखवण्यात आले होते. ते दृश्यही दुसऱ्या ट्रेलरमध्ये जोडण्यात आले असून, त्यामुळे या वेळी साळगावकर कुटुंबीय पोलिसांच्या तावडीत अडकणार का? की विजय त्याच्या प्लॅनिंगने यासर्व प्रकरणातून आपल्या परिवाराला बाहेर काढतो की त्याचा खेळ संपतो. असा प्रश्न चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.हे नोव्हेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा लागली आहे. वायकॉम 18 स्टुडिओच्या वतीनं आणि टीसीरिजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित अजय देवगणचा 'दृश्यम 2' 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अजय देवगण व्यतिरिक्त तब्बू, श्रिया सरन, मृणाल जाधव आणि इशिता दत्ता दिसल्या होत्या.

मात्र यावेळी अक्षय खन्नाची एन्ट्री होत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, जो ह्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आला आहे. तो आधी 'मॉम' या चित्रपटातही या सारख्याचं मिळत्या जुळत्या भूमिकेत होता. मात्र त्यात मर्डर केसच्या आरोपीचा शोध घेतल्यानंतरही त्यांने आरोपीला दोषी न ठरवता भावनिक होत ते प्रकरण हाताळले होते. त्यामुळे आता पुन्हा या चित्रपटातही विजयची बाजु समजून घेत त्याची आणि त्याच्या परिवाराची निर्दोष मूक्तता करतो कि मीरा देशमुखची बाजू घेत त्यांच पितळ उघड करतो हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेलं  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने