राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

इंदौर: भारत जोडो यात्रेसाठी देशभरात फिरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदौरमध्ये बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे. इंदौरमधल्या एका दुकानात हे पत्र आलं आहे.इंदौरमधल्या एका मिठाईच्या दुकानात हे निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे. २४ नोव्हेंबरला राहुल गांधी इंदौरमध्ये जाणार आहेत. त्या आधी हे धमकीचं पत्र आलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आता सतर्क झाले असून हे पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.गलेला नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने