'विराट' परंपरा रोहितने नेली पुढे; आपल्या बिजनेस क्लास सीटबाबत घेतला मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप खेळत आहे. ऑस्ट्रेलिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीकोणातून खूप मोठा देश असल्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळण्यासाठी संघांना खूप मोठा प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, याच प्रवासात भारतीय वेगवान गोलंदाजांना विश्रांती मिळावी यासाठी भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपली बिजनेस क्लासची सीट वेगवान गोलंदाजांना दिली आहे. तसेही वेगवान गोलंदाजांची उंची जास्त असते तसेच मोठ्या प्रवासात त्यांना पाय अखडून बसावे लागते. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपली बिजनेस सीट वेगवान गोलंदाजांना देऊ केली आहे.याबाबत भारतीय संघातील एका सहाय्यक सदस्याने सांगितले की, 'मैदानावर सर्वात जास्त श्रम हे वेगवान गोलंदाज करतात. त्यामुळे त्यांना प्रवासात त्यांचे पाय अखडून बसावे लागू नये म्हणून आम्ही स्पर्धेपूर्वी ठरवले की बीजनेस क्लास सीट त्यांना द्यायची.'आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला 4 बिजनेस क्लास सीट मिळतात. या सीट सहसा संघाचे प्रशिक्षक, कर्णधार, उपकर्णधार आणि व्यवस्थापक यांना दिली जाते. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाला भारतीय संघाला प्रत्येक 3 ते 4 दिवसांनी प्रवास करावा लागतो याची जाणीव आहे. त्यामुळे सर्वाधिक श्रम करावे लागणाऱ्या वेगवान गोलंदाजांना या सीट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, वेगवान गोलंदाजांना बिजनेस क्लासची सीट देण्याची ही परंपरा विराट कोहली कर्णधार होता तेव्हाही पाळली जात होता. त्यावेळी देखील वेगवान गोलंदाजांना विश्रांती मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. हीच चांगली परंपरा नवा कर्णधार रोहित शर्माने देखील कायम ठेवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने