खूनाच्या चार महिन्यानंतर मित्राची दिशाभूल करत होता आफताब; म्हणाला, “श्रद्धाला सांग मला…”

दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. तिचा प्रियकर आफताब पूनावालाने श्रद्धाचा ३५ तुकडे करुन खून केला. खून केल्यावर चार महिन्यांनी आफताबने श्रद्धाच्या मित्राला केलेली चॅट समोर आली आहे. त्यामध्ये आफताब श्रद्धाच्या मित्रांची दिशाभूल करत असल्याचं दिसत आहे. तसेच, श्रद्धा आपल्याबरोबर राहत नाही, असे आफताब दाखवत असल्याचं चॅटमधून दिसते.श्रद्धाच्या मित्राने मुंबई पोलिसांना ही इंस्टाग्राम चॅट दिली असून, आपला जवाब नोंदवला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात आफताबने श्रद्धाच्या मित्राला मेसेज केला होता. त्यात “भाऊ कसा आहे? तुझ्याशी बोलायचं आहे. श्रद्धाला सांग फोन करण्यासाठी,” असे आफताबने मेसेजमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर दोघांनी १७ मिनिट फोनवरून चर्चा केल्याचं श्रद्धाच्या मित्राने पोलिसांना सांगितलं. ‘एनडीव्हीटी’ने याबाबत वृत्त दिलं आहे.दरम्यान, श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 मध्ये तुळींज पोलीस ठाण्यात आफताबच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीत तिने आफताब मागील सहा महिन्यापासून मारहाण करत असून त्याने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचं सांगितलं होतं. याबाबत आफताबच्या कुटुंबाला सुद्धा माहिती असल्याचे तिने खुलासा केला आहे. श्रद्धाने आफताब आणि ती लवकरच लग्न करणार असल्याचे सुद्धा श्रद्धा म्हणाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने