करणला 'सीमा आंटी' का म्हणू लागलेयत लोक?, स्वतः खुलासा करत म्हणाला...

मुंबई: निर्माता-दिग्दर्शक करण जोहर कधी आलिया भट्टला पाठिंबा दिल्यामुळे तर कधी नेपोटिझममुळे तर कधी बॉलीवूडमध्ये जोड्या जुळवण्यामुळे चर्चेत आलेला दिसतो. आता पुन्हा असं काहीतरी घडलं आहे ज्यानं त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. करण जोहरला स्वतःला हे मान्य आहे की तो मॅचमेकर आहे. जोड्या जुळवणं त्याला उत्तम जमतं हे अनेकदा त्यानं बोलून दाखवलं आहे.

कोणाचं जर का ब्रेकअप होत असेल तर तो ते नातं सहसा तुटू देत नाही. कोणाचं जर लग्न होत आहे तर त्याची जबाबदारी देखील तो आपल्या खांद्यावर घेतो. सिनेइंडस्ट्रीत असे कितीतरी सेलिब्रिटी कपल्स आहेत,ज्यांच्या जोड्या त्यानं जुळवल्या आहेत. काहा दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत करण जोहरने म्हटलं होतं की सिनेइंडस्ट्रीत मॅचमेकिंग करणं हा त्याचा अजेंडा आहे. निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालनची जोडी देखील जुळली ती करणमुळेच.या ट्विंकल खन्नाच्या शो मध्ये जेव्हा तिनं करणला म्हटलं होतं की,''तू सिने इंडस्ट्रीतली 'सीमा आंटी' आहेस. तू मॅचमेकिंग करतोस. जसे तुझे वडील होते,तसाच तू देखील आहेस. मी एकदा वहिदा रेहमान यांच्याशी बोलत होते,तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की, तुझ्या वडीलांनीच त्यांचे लग्न ठरवले होते. हे मला वाटतं तुमच्या रक्तात आहे, जे तुम्ही दोन लोकांना एकत्र आणता''.ट्विंकल खन्नाच्या करणविषयीच्या वक्तव्याला दुजोरा स्वतः करणनं दिला अन् म्हणाला, ''मी स्वतः जबाबदारी यासाठी स्विकारतो कारण मला हे करायचं आहे हा विचार मी पक्का केलेला असतो. मला असं करुन आनंद मिळतो. माझ्या आयुष्याचा हा महत्त्वाचा अजेंडा आहे,जसे इतर अजेंडे राहिले आहेत. विद्याने एकदा मला फोन केला होता,तेव्हा मी तिची ओळख सिद्धार्थ रॉय कपूरशी करून दिली. दोघांचे बोलणे सुरु झाले आणि मला तेव्हा खूप बरं वाटलं होतं. कुठल्या सिनेमाच्या फीडबॅकवर इतकं बोललं जात नाही,जेवढ्या गप्पा या दोघांमध्ये तेव्हा झाल्या होत्या''. आता करण खरं तर चांगले काम करतोय. पण सोशल मीडियावर मात्र त्याला सगळे नेटकरी मॅचमेकर सीमा तपारीया यांच्या नावावरुन चिडवताना 'सीमा आंटी' म्हणत ट्रोल करु लागलेयत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने