कॅप्टन पदासाठी किरण माने स्पर्धेत.. कोण होणार विजयी?

मुंबई :बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन होण्यासाठी स्पर्धकांमध्ये प्रचंड चढाओढ असते. त्यामुळे कॅप्टनसी कार्यात पुढे राहण्यासाठी स्पर्धक वाटेल ते करतात. कारण कॅप्टन होणं म्हणजे घरात एक आठवडा मुक्काम फिक्स, शिवाय अनेक महत्वाचे निर्णय घेण्याची ताकद मिळते. यंदा बिग बॉस मराठीच्या घरात किरण माने आणि रोहित शिंदे हे दोन सदस्य कॅप्टनसीच्या शर्यतीत आहेत. त्यांच्यामध्ये एक भन्नाट खेळ रंगणार आहे.बिग बॉस मराठीच्या घरात दोन्ही टीम मधून दोन सदस्य कॅप्टन पदासाठी समोर आले आहेत. या दोघांमध्ये आज कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. बिग बॉस आज एकदम भन्नाट टास्क दिला आहे, तो म्हणजे 'टेडी बेयर' तयार करणे. आजच्या भागात दिसेल की बिग बॉस मराठीच्या घरात वॅलेनटाईन डे साजरी होणार आहे. या 'वॅलेनटाईन डे'च्या निमित्ताने टेडी बेअर म्हणजेच कापसाचे बाहुले बनवण्याचा टास्क दिला आहे. यामध्ये किरण आणि रोहित यांच्या सह दोन्ही टीम खेळताना दिसणार आहेत.

जे समर्थक आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त टेडी बिअर बनवून देतील तो उमेदवार कॅप्टनपद मिळवेल. किरण VS रोहित असा आजचा टास्क रंगणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला असून स्पर्धक मोठ्या उत्साहात टेडी बनवताना दिसणार आहेत. पण हे कार्य यशस्वी होणार का? कोण कोणाचे टेडी पळवणार, कोण टेडी फाडणार हे आजच्या भागात कळेल. पण किरण माने स्पर्धेत असल्याने सर्वांचे लक्ष आजच्या कॅप्टनसी कार्याकडे लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने