वधू-वरांचा फोटो, आकर्षक रंग अन् बरंच काही; हार्दिक जोशी-अक्षया देवधरच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर

मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांच्या केळवणाचे आणि बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले होते. त्यानंतर आता त्यांच्या लग्नपत्रिकेचा एक खास फोटो समोर आला आहे.अभिनेता हार्दिक जोशीने नुकतंच त्याच्या इन्सटाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या एका मैत्रिणीचा स्टोरीचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. यात अक्षया आणि हार्दिकच्या लग्नपत्रिकेची झलक पाहायला मिळत आहे.त्यांच्या लग्नाची पत्रिका चॉकलेटी रंगाची आहे. यावर वधू वरांचा फोटो पाहायला मिळत आहे. ही लग्नपत्रिका फारच आकर्षक असल्याचे पाहायला दिसत आहे. यावरील डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पत्रिकेवर शुभमंगल सोहळा असेही लिहिण्यात आले आहे. त्याबरोबर चांदीचा पानाचा विडाही पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या फोटोवर ‘बहुप्रतिक्षित लग्न’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच अहा असा हॅशटॅगही देण्यात आला आहे. अक्षया आणि हार्दिक या दोघांना ही या पत्रिकेत टॅग करण्यात आले आहे. मात्र ते दोघेही कधी आणि कुठे लग्न करणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.दरम्यान छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नसली तरी त्यासाठी चाहते फारच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने