शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफावर खास रोषणाई, हटके अंदाजात दिल्या गेल्या किंग खानला शुभेच्छा

मुंबई :काल बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा काल ५७वा वाढदिवस झाला. दरवर्षी शाहरुख चाहते त्याच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. शाहरुखचे चाहते फक्त भारतातच नाही तर परदेशातही आहेत. वाढदिवसाच्या दिवशी त्याचे चाहते विविध प्रकारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतात. दरवर्षी त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी जमते. यावर्षीही शाहरूख खानचे चाहते रात्री आपल्या लाडक्या शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या ‘मन्नत’ बंगल्या बाहेर चाहत्यांनी तुडुंब गर्दी होती. तर परदेशातही त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला गेला.२ नोव्हेंबर रोजी जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर शाहरुख खान झळकला. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफावर विशेष रोषणाई करण्यात आणि होती. बुर्ज खलिफावर शाहरुखचा फोटो झळकवत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बुर्ज खलिफावर शाहरुखसाठी खास संदेश लिहिण्यात आला. तेथे लिहिले होते, “हॅपी बर्थडे शाहरुख, हॅपी बर्थडे पठान…” यासोबतच शाहरुख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे गाणेही वाजवण्यात आले. ल्हे गाणे वाजताच बुर्ज खलिफावर “वी लव्ह यू” चमकू लागले. तसेच या इमारतीवर शाहरुख खानचे छायाचित्रही दाखवण्यात आले.

बुर्ज खलिफावरील हे दृश्य पाहण्यासाठी शाहरुख खानचे शेकडो चाहते जमले होते. तेथे त्याच्या चाहत्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत त्याच्याबद्दलचे प्रेम व्यक्य केले. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफा उजळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या ४ वर्षांपासून शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफावर वेगवेगळ्या प्रकारे रोषणाई करण्यात येत आहे आणि किंग खानला शुभेच्छा दिल्या जात आहेत. शाहरुखने आपला खास दिवस त्याचे कुटुंबीय, त्याची खास मैत्रीण फराह खान आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर साजरा केला. यावेळी त्याने मोठा केक कापला आणि ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर डान्सही केला. शाहरुख खानचा डान्स पाहून विद्यार्थ्यांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. या सर्वांबरोबर वाढदिवस साजरा करताना शाहरुख खूप आनंदी होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने