बिग बॉसने स्वत:च्या फायद्यासाठी नियम ठेवले धाब्यावर? अर्चनाच्या एंन्ट्री...

मुंबई : बिग बॉस 16चा यंदाचा सिझन हा चांगलाच गाजतोय. स्पर्धकांच्या हाणामारीमूळे तर कधी शाब्दिक चकमकीमूळे शो चर्चेत आहे. त्यातच अर्चना गौतमला रात्री घरातून हाकलण्यात आलं मात्र  तिच्या घरात पुन्हा एंट्रिने बिग बॉस 16 मध्ये नवीन वळण पाहायला मिळाले.तिने शिवसोबत भांडतांना त्याचा गळाचं धरला. अर्चनाने शिवाचा गळा पकडला. यानंतर घरात बराच गोंधळ झाला आणि अर्चनाला बिग बॉसच्या सर्वात मोठ्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल शोमधून बाहेर फेकण्यात आले. हिंसाचारानंतरही तिची शोमधील वापसी अनेकांना खटकली. तिच्या पुनरागमनाने शोचे चाहतेही नाराज झाले. अनेकांनी सोशल मिडियावर प्रतिक्रियाही दिली.त्यातच आता उमर रियाझ जो शोच्या 15 व्या सीझनमध्ये दिसला होता, त्याने देखील त्याच मत माडलंय इतकच नाही तर त्याने या शोच्या निर्मात्यांवर आणि नियमांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उमर रियाझने ट्विट केले आहे. त्याने लिहिलयं, “तर  अर्चना कथित हिंसेसाठी घरातून बाहेर काढल्यानंतरही तिला घरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. पण माझ्यासाठी नियम वेगळे का होते? मला स्विमिंग पुलमध्ये ढकलले गेले. काही न करता! ज्या कामासाठी मी प्रत्युत्तर दिले त्या कामात मला ढकलल्यात आले पण प्रत्येक दोष माझ्यावरच टाकला गेला. हा भेदभाव का?उमरला शो दरम्यान त्याने स्पर्धक प्रतीक सहजपालला धक्का दिला होता. त्यामुळे  त्याला बिग बॉस 15 मधून बाहेर काढण्यात आले. त्याच्या या ट्विटवर अनेंकानी प्रतिक्रिया देत उमरला पाठिंबा दिला आहे.

 आता बिग बॉस16 व्या सिझनमध्येही घरातल्यांना अर्चनाचं येणं आवडलेलं नाही. त्यात साजिद खान आघाडीवर आहे.साजिदने अर्चनाची बाजू घेणाऱ्या प्रियंका चहर चौधरी, अंकित गुप्ता आणि सौंदर्या शर्मा यांच्यासोबतही जोरदार वाद घातला. शोचा होस्ट सलमान खाननेही अर्चनाला भांडणासाठी उत्तेजित केल्याबद्दल शिवला फटकारलं होतं. अर्चनाला दुसरी संधी देण्यात आली. बिग बॉसच्या घरात परतल्यानंतर तिने तिच्या कृतीबद्दल सर्वांची माफी मागितली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने