'मॅडम,तुम्ही लहानपणीही किती...',बालदिनी मानसी नाईकचा फोटो अन् चाहत्याची कमेंट चर्चेत

मुंबई : आज १४ नोव्हेंबर,बालदिन. खरंतर पंडित जवाहरलाल नेहरुंच्या जन्मदिना निमित्तानं हा दिवस वर्षांनुवर्षे आपण साजरा करत आलो आहोत. पण जेव्हा पासून सोशल मीडियाचं प्रस्थ वाढलंय तेव्हापासनं मात्र या दिवसाला एक वेगळं ग्लॅमर प्राप्त झालेलं दिसून येतं. या दिवशी सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच आपले बालपणीचा फोटो पोस्ट करताना दिसतात.खासकरुन नेटकऱ्यांचे लक्ष असते ते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या लहनपणीच्या फोटोवर. आणि सेलिब्रिटी देखील अगदी आपला दुर्मिळातला दुर्मिळ असा बालपणीचा फोटो शोधून काढतात आणि पोस्ट करतात. आता खरी गम्मत पुढेच असते. या फोटोंवर चाहते ज्या भन्नाट कमेंट नोंदवतात त्यांची देखील चर्चा रंगलेली दिसून येते. अशीच चर्चा आज बालदिनानिमित्तानं रंगली आहे रिक्षावाली फेम अभिनेत्री मानसी नाईकच्या फोटोवर.मानसी नाईकनं बालदिनाच्या निमित्तानं तिच्या लहानपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ती तिचे आई-वडील आणि आजी-आजोबांसोबत दिसत आहे. फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे,''अलमारी से निकले बचपन के खिलौने,मुझे ऐसे देखकर बोले,तुम्हे ही शौक था बडे होने का....''. मानसीनं आपला साधा लहानपणीचा फोटो पोस्ट करत बालपणीच्या आठवणी जागवल्या आहेत. पण यावर तिच्या चाहत्यांनी मात्र एकापेक्षा एक लक्षवेधी कमेंट त्यावर केल्या आहेत. कुणीतरी लिहिलंय,'मॅडम छोटेपणी पण तुम्ही छान दिसायच्या', तर कुणी लिहिलंय,'लहानपणापासूनच तुझे डोळे टपोरे होते का?',तर कुणी मानसी तिच्या आजीसारखीच दिसतेय असं म्हणालंय.

मानसी नाईक सोशल मीडियावर भन्नाट रील,पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असते. डान्सिंग क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसीच्या डान्सिंग रीलची नेहमीच चर्चा रंगते. आपल्या पतीसोबतच नाही तर घरच्या मोलकरणींसोबतही ती भन्नाट रील पोस्ट करत असते. नुकतीच ती नवऱ्याला घटस्फोट देत असल्याची अफवा देखील पसरली होती. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं होतं. मानसी सिनेमे कमी करत असली तरी तिनं केलेलं सिनेमातलं गाणं मात्र भन्नाट गाजतं आणि ती मात्र भाव खाऊन जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने