भात मागण्यासाठी चीनी लोक वापरताहेत मिथूनचं गाणं

 चीन : चीनमध्ये कोरोनाविरोधात लावण्यात आलेल्या झिरो कोविड ​​​​पॉलिसी ला घेऊन जोरदार विरोध सुरू आहे. विशेष म्हणजे या दरम्यान भारतीय दिवंगत सिंगर बप्पी लाहिरी म्हणजेच मिथूनदाचं गाणं ‘जिमी जिमी आजा आजा’ चांगलचं व्हायरल होत आहे.हे गाणे 1982 च्या "डिस्को डांसर" या चित्रपटातील आहे. सध्या चिनी लोक या गाण्यावरुन सरकारला ट्रोल करत आहे. ‘जि मी, जि मी’ ला चीनी भाषेत 'मला भात हवा, मला भात हवा' असा अर्थ होतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चीनचे लोक खाली भांडी दाखवत ‘जि मी, जि मी’ गाण्यावर रिल करत आहे. लॉकडाउनदरम्यान चीनच्या लोकांचे खाण्याचे खूप हाल झाले. यावरुनच झिरो कोविड ​​​​पॉलिसीला घेऊन अशा रिल्स बनवून चीनचे लोक जोरदार टिका करत आहे.


चीनमध्ये एक सुद्धा कोरोना पॉजिटिव केस समोर आल्यानंतर लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ट्रांसफर केले जाते. सध्या बप्पी लहरीचं गाणं खूप व्हायरल होत असून या गाण्यावर बनवलेल्या रिल्स सुद्धा प्रचंड गाजत आहेत. सध्या नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने