फडणवीस आपसे ये उमीद ना थी...सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

पुणे : मागील आठवड्यापासून राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातून त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. अशातच पुण्यात राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवार निशाणा साधला आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या अपघाताची पाहण करण्यासाठी राष्ट्रवादी सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, यावेळी त्यांनी अनेक गोष्टावर भाष्य केलं. राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरही सुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे.



फडणवीस आपसे ये उमीद ना थी असे म्हणत, दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला आणि त्यांनी राज्यपाल यांची पाठ राखण केली. असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, यापुढे भाजपला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. असही त्या यावेळी म्हणाल्या.यासोबत, माझी भूमिका ही पक्षाची भूमिका आहे. राज्यपाल याच्यावर टीका करण आपली संस्कृती नाही,पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. असेही सुळे यावेळी म्हणाल्या.नवले ब्रिज अपघाताबद्दल बोलताना त्यांनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटलं आहे. सर्व्हिस रोड झाले नाही, क्रोनिक पॉईंट झाले, उतार आहे. या रस्त्यावर काम करणं महत्त्वाचं आहे. आज पुणे महापालिका आयुक्त सगळे टीम यासंदर्भात बैठक घेणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने