राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांची सुटका करण्याचे आदेश आज (११ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.



राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुटका करण्यात आलेली दोषी महिला नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर नलिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.याआधी राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारिवालन याची १८ मे रोजी सुटका करण्यात होती. पेरारिवालन याने राजीव गांधींच्या हत्याप्रकरणात ३० वर्षे शिक्षा भोगलेली आहे. त्याने संविधानातील कलम १४२ चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती. दोषी नलिनीने पेरारिवालनच्या बाबातीत घेण्यात आलेल्या याच निर्णयाचा दाखला देत माझीही सुटका करावी अशी मागणी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने