रिजेक्शननंतर ट्रेनमध्ये ढसाढसा रडला होता आयुष्मान, शेअर केला तो किस्सा...

मुंबई : टिव्ही वरील मालिकाबरोबरच रिअॅलिटी शोही प्रेक्षकांच्या पंसतीस उतरत असतात. मग तो बिग बॉस असो किंवा कौन बनेगा करोडपती.... त्याच बरोबर सोनी टीव्हीवरील सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल' खूप लोकप्रिय आहे. या शोच्या माध्यमाने प्रेक्षकांना गाण्याच्या एका सुरेल मैफिलीचा आनंद घेता येतो. शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता येणार्‍या या शोमध्ये प्रत्येक वेळी कोणी ना कोणी सेलिब्रिटी येत असतात. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या भागात 'अ‍ॅन ॲक्शन हिरो'ची कलाकार दिसणार आहे.आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत हो दोघ त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत, 'अ‍ॅन ॲक्शन हिरो' हा चित्रपट 2 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत त्यांच्या 'अ‍ॅन ॲक्शन हिरो' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते. याचदरम्यान त्यांनी भरपूर गप्पा मारल्या.यावेळी आयुष्मानने नेहा कक्करशी संबंधित एक किस्साही सांगितला जो एकून सगळ्यांना आश्चर्यही वाटले आणि तो किस्सा ऐकून सगळे हसायलाही लागले. यानंतर आयुष्मान सांगतो, 'मला आणि नेहाला इंडियन आयडॉलमधून एकाच दिवशी रिजेक्ट करण्यात आले होते. आणि आम्ही मुंबईहून दिल्लीला ट्रेनने परत जात होतो. आम्ही 50 जण होतो आणि एकत्र रडत होतो. नेहा आज जज आहे आणि आज मी इथे आलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे’.

यावेळी आयुष्मानमे त्याच्या 'अ‍ॅक्शन हिरो' या चित्रपटाबद्दलही सांगितले. या चित्रपटात तो एका सुपरस्टारची भूमिका साकारत आहे.. मग अशी परिस्थिती येते जेव्हा जयदीप अहलावतचे पात्र भुरा सोलंकी त्याच्या मागे लागतो. आदित्य नारायणने दोघांनाही त्यांच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर आयुष्मान त्याच्या 'दम लगा के हैशा' या चित्रपटातील 'दर्द करारा' गाण्यावर स्पर्धकांसोबत डान्स करतो आणि नंतर 'नजम-नजम' गातो. त्यानंतर तो त्याच्या 'अ‍ॅक्शन हिरो' चित्रपटातील गाण्यावरही दमदार डान्स करतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने