‘दबंग ४’ बनवण्यासाठी सलमान खान आणि अरबाज उत्सुक पण ‘ही’ आहे मोठी अडचण, दिग्दर्शकाचा खुलासा

मुंबई : सलमान खान आणि अरबाज खान या जोडगोळीने गेल्या काही वर्षात प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यांच्या ‘दबंग’ या चित्रपटाच्या सिरीजने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली. या चित्रपटात सलमान खानची चुलबुल पांडेची शैली सर्वांनाच आवडली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे तीन भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाले असून सलमान खानचा भाऊ अरबाज खान यानेच याचे दिग्दर्शन केले आहे. ‘दबंग ३’ नंतर सलमान खान आणि चित्रपटाचे चाहते चौथ्या भागाची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत लोकांची उत्सुकता शमवण्यासाठी अरबाज खानने एका मुलाखतीत चित्रपटाच्या चौथ्या भागाबाबत मोठा इशारा दिला आहे.अरबाज खान सध्या सोनी लिव्हवरील आगामी ‘तनाव’ या सिरीजमुळे चर्चेत आहे. या सिरीजमध्ये अरबाज खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजच्या प्रमोशनच्या निमित्ताने अरबाज खानने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्याने ‘दबंग ४’ हा त्याच्या आगामी प्रोजेक्टपैकी एक आहे आणि लवकरच तो ‘दबंग’ या सुपरहिट चित्रपटाचा नवा भाग घेऊन येणार आहे, असं त्याने सांगितलं.दबंग ४’बद्दल बोलताना अरबाज खानने सांगितलं की, “या चित्रपटावरील त्याचे काम सुरू आहे. पण हा चित्रपट बनवण्यासाठी त्याला आणि सलमान खानला आपापल्या प्रोजेक्टमधून थोडं मोकळं व्हावं लागेल. ‘दबंग ४’ रिलीज करायला ‘दबंग २’ आणि ‘दबंग ३’ इतका वेळ लागणार नाही.”

पुढे तो म्हणाला, “मी लवकरच माझ्या सध्या सुरु असलेल्या प्रोजेक्ट्समधून मोकळा होईन आणि ‘दबंग 4’ या चित्रपटावर लक्ष केंद्रित करेन. कारण हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. मला हा चित्रपट खूप मन लावून आणि प्रेमाने बनवायचा आहे. यासोबतच या चित्रपटातून मला प्रेक्षकांच्या अपेक्षाही पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात ‘दबंग 4’ची अधिकृत घोषणा होईल अशी मला आशा आहे.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने