डान्ससाठी काहीपण! ‘झलक दिखला जा’साठी रुबिना दिलैकने परिधान केला ‘इतक्या’ किलोचा घागरा

मुंबई :  छोट्या पडद्यावरील एक अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘झलक दिखला जा.’ या कार्यक्रमाच्या या पर्वात नावाजलेले कलाकात स्पर्धक म्हणून सहभागी होऊन त्यांचे नृत्य कौशल्य दाखवत आहेत. अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील या बहुचर्चित डान्स शोमध्ये तिने सहभाग घेतला. एकापेक्षा एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करत ती प्रेक्षकांप्रमाणेच या शोच्या परीक्षकांचं मन जिंकत आहे. नृत्यासाठी ती खूप मेहनत घेते. नृत्य उत्कृष्ट होण्यासाठी तिला काहीही करावं लागलं तरी ती मागे पुढे बघत नाही.अभिनेत्री रुबिना दिलीकचा एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. यात ती एक घागरा घालून पोज देताना दिसत आहे. तसेच ती हा घागरा घालून गोलही फिरत आहे. हा घागरा काळ्या रंगाचा असून त्यावर लाल रंगाची ओढणी तिने परिधान केली आहे. रुबिना ज्या सहजतेने त्या घागऱ्यात वावरत आहे त्यावरून या घागरा हलका असेल असं जाणवतं. पण तसं अजिबात नाही. या घागऱ्याचं वजन थोडं थोडकं नसून तब्बल ३१ किलो आहे. हा खुलासा तिने स्वतः केला.

या पोशाखात ती खूप सुंदर दिसत आहे. यादरम्यान तिने पापराझींना एक डान्स स्टेपही करून दाखवली. यासोबतच तिने या घागऱ्याचे वजनही सांगितले. या व्हिडीओमध्ये रुबिना दिलैक सांगत आहे की, तिचा घागरा ३६ कळ्यांचा आहे आणि याचे वजन ३१ किलो आहे. हा ड्रेस इतका जड आहे आणि त्याचा घेरही खूप मोठा आहे पण त्यात ती आरामात फिरत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी तिच्या जिद्दीचे खूप कौतुक केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने