जगातील जीवघेणं रोपटं! त्याचा स्पर्श माणसाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो

मुंबई : पृथ्वीवर वनस्पती आणि प्राण्यांच्या बऱ्याच घातक प्रजाती आहेत. असंच एक भयानक रोपटं पृथ्वीवर आढळून आलं. जगातील सगळ्यात भयानक आणि धोकादायक रोपट्यामध्ये याची गनणा केली जाते. या रोपट्याबाबत ऐकून तुमचीही झोप उडेल. जाणून घ्या या रोपट्याबाबत.जगभऱ्यात झाडे ऑक्सिजन देतात असे म्हटले जाते. मात्र या झाडाबाबत माहिती झाल्यास तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ब्रिटनमधील एका व्यक्तीला झाडे लावयला फार आवडायचं. जुन्या झाडांना कंटाळून त्याने नवं रोपटं लावायचं ठरवलं. मात्र आता हेच झाड आज पिंजऱ्यात बंद करून त्याला ठेवावे लागते आहे. हे रोपटं एवढं भयानक आहे की पिंजऱ्यावरदेखील हे धोकादायक अशी खूण नोंदवली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.डॅनियल एलमिन जोन्स या ब्रिटनच्या व्यक्तीने हे रोपटं लावलं होतं. हे रोपटं होतं 'जिम्पाई जिम्पाई' नावाचं. या रोपट्याला जगातील सगळ्यात भयानक रोपटं मानलं जातं. या व्यक्तीने या रोपट्याबाबतची कहाणी सांगितली. काहीतरी वेगळं करण्यासाठी त्याने वसंत ऋतूमध्ये हे रोपटं लावलं.

हे रोपटं आता पिंजऱ्यात कैद करावं लागलं

रोपटं लावणाऱ्या व्यक्तीच कदाचित या रोपट्यामध्ये असलेल्या जीवघेण्या घटकांची कल्पना नसावी. जिम्पाई जिम्पाईला जगातील सगळ्यात भयानक रोपटं असून यास स्पर्श होताच तुम्हाला विजेचा झटका लागल्याचा भास होतो. असं म्हणतात की हे रोपटं माणसाला एवढं तडपवतं की आणि त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी माणसाला आत्महत्या करावी लागते. या रोपट्याला सुसाईड प्लांट असेही म्हणतात.

रोपट्याने घेतला अनेकांचा बळी

रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने टॉयलेटमध्ये हे झाड ठेवलं होतं. यानंतर हा व्यक्ती एवढा त्रस्त झाला की त्याने स्वत:लाच गोळी झाडत आत्महत्या केली. रोपट्याला हात लावताच मनुष्य अस्वस्थ व्हायला लागतो.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने