कोल्हापूरच्या कन्येशी राहुल गांधींचा संवाद

कोल्हापूर : भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात सोमवारी दाखल झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापुरातील शर्वरी माणिकराव माणगांवे हिच्याशी संवाद साधला. गर्दीतूनच शर्वरी हिने राहुल यांना हाक मारली. त्याला प्रतिसाद देत राहुल यांनी तिला भेटायला बोलावले.शर्वरी या टेम्पोमधील रोलिंग स्टोन आईस्क्रिमचा व्यवसाय करतात. त्या मंगळवार पेठेत राहतात. कुस्तीतील ऑलिम्पिक पदक विजेते के. डी. माणगांवे यांच्या त्या नात आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी त्या नांदेड येथे गेल्या आहेत. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेचे काल नांदेडमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. ही यात्रा आज पुढे सरकत असतानाच शर्वरीने राहुल यांना हाक मारली व भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

राहुल यांनीही तिला भेटायला यात्रेत बोलावले. पाच मिनिटे तिच्या हातात हात घालून त्यांनी तिच्या व्यवसायासह इतर माहिती घेतली. कोठून आलाय, काय करतेस, टेम्पोचो फोटो दाखव, रोलिंग स्टोन आईस्क्रिम स्वतःचा ब्रँड आहे का? त्यात कोणते फ्लेव्हर आहेत, अशी विचारपूस राहुल यांनी केली. मी आलो की, आईस्क्रिम खायला येतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.शर्वरी हिच्या रूपाने महाराष्ट्रातील पहिल्या तरुणीशी राहुल यांनी यात्रेच्या पहिल्याच दिवशी संवाद साधला. गेल्या ६५ दिवसांपासून ते यात्रेच्या निमित्ताने चालत आहेत. त्यांना हात करण्यासाठी, भेटण्यासाठीही यात्रेच्या दुतर्फा गर्दी असते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने