Mizoram मध्ये खाण कोसळून दुर्घटना, 12 जणांचे मृतदेह काढले बाहेर; BSF-NDRF चं बचावकार्य सुरू

मिझोराम: मिझोरामच्या हनहथियाल जिल्ह्यातील मौद्रह गावात अपघातस्थळावरून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. हनहथियालचे अतिरिक्त उपायुक्त साजिकपुई यांनी ही माहिती दिलीय.उपायुक्त यांनी सांगितलं की, 'मौद्रह गावातील दगडखाणीच्या ढिगाऱ्यातून शोध आणि बचाव पथकांनी आणखी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. यासह आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे.'याआधी उपायुक्त आर लालरेमसांगा यांनी सांगितलं की, खाण कोसळण्याच्या घटनेत 12 जण बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत त्यापैकी आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी शोधमोहीम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मंगळवारी सकाळी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचं (NDRF) एक पथक तिथं पोहोचलं. यात दोन अधिकारी आणि 13 जवानांचा समावेश आहे.लालरेमसांगा यांच्या म्हणण्यानुसार, अपघातात बेपत्ता झालेल्या 12 पैकी चार एबीसीआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कर्मचारी होते, तर इतर आठ जण एका कंत्राटदारासोबत काम करत होते. घटनास्थळी आसाम रायफल्स आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी स्थानिक पोलिस आणि लोकांना मदतकार्यात मदत केली.

पश्चिम बंगालमधील 4 मजूर

मिझोराम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 8 मजुरांपैकी 4 मजूर पश्चिम बंगालचे आहेत. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 25 वर्षीय मदन दास, 21 वर्षीय राकेश विश्वास, 22 वर्षीय मिंटू मंडल आणि 25 वर्षीय बुद्धदेव मंडल अशी मृतांची नावं आहेत. सोमवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडलीय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने