खुनाचा आरोप असलेल्या कुस्तीपटू सुशिल कुमारला जामीन.

दिल्ली: खुनाचा आरोप असलेल्या कुस्तीपटू सुशिल कुमारला दिल्ली न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशिल कुमारवर 27 वर्षाचा कुस्तीपटू सागर धनकरच्या खुनाचा आरोप आहे. सुशिल कुमारला दिल्ली न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.



सुशिल कुमरचे वकील आरएस मलिक यांनी मानवी दृष्टीकोणातून तीन आठवड्यांसाठी सुशिल कुमारला अंतरिम जामीन मिळावा अशी याचिका दाखल केली होती. सुशिल कुमारच्या पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर तिची काळडी घेण्यासाठी सुशिल कुमारला जामीन मिळावा अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती.

दम्यान या जामीन याचिकेवर दिल्ली न्यायालयातील अतिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी सुशिल कुमारला जामीन मंजूर केला. यावेळी त्यांनी 'याचिकाकर्त्यांची पत्नी शस्त्रक्रियेनंतर दैनंदिन कामे स्वतः करू शकणार नाही हे आम्ही नाकारत नाही. त्यांना यासाठी काही दिवस दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या पत्नीची वैद्यकीय स्थिती पाहता, तसेच त्यांना दोन अल्पवयीन मुले आहेत या सर्वाचा विचार करता याचिकाकर्ता यावेळी पत्नीजवळ असणे गरजेचे आहे असे न्यायालयाचे म्हणणे आहे.' असे निरिक्षण नोंदवले.यानंतर सुशिल कुमारला वैयक्तित 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने