मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

दिल्ली:  मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर केला आहे. दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने जॅकलिनला जामीन मंजूर केला आहे. तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय जॅकलिनला देश सोडता येणार नाहीये.सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलीनविरुद्ध आरोपपत्र सादर केल्यानंतर तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून जॅकलीन फर्नांडिसला ५.७१ कोटींच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. चंद्रशेखर बराच काळ तिचा साथीदार होता. सुकेशने सहआरोपी पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला या भेटवस्तू दिल्या होत्या’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले होते. चंद्रशेखरने फर्नांडिसला भेटवस्तू देण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केला, असा आरोपही ईडीने केला आहे.


‘सुकेश चंद्रशेखर हा गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून दिल्ली पोलिसांद्वारा अटक होईपर्यंत जॅकलीन फर्नांडिसशी नियमित संपर्कात होता’ असे एजन्सीने तपासात आढळल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत चंद्रशेखर, पत्नी लीना मारिया पॉल आणि पिंकी इराणी यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. दिल्ली न्यायालयात दोन आरोपपत्रेही दाखल केली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने