'ही' वेबसिरीज पाहून आफताबने प्रेयसीच्या देहाचे केले ३५ तुकडे

दिल्ली : श्रद्धा वालेकर या वसईतल्या तरुणीच्या निर्घृण हत्येने सध्या देशभरात खळबळ माजली आहे. तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धाची हत्या करून तिच्य़ा मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे तीन आठवडयांपर्यंत फ्रीजमध्ये ठेवले आणि विविध जंगलांत टाकले. एवढी क्रूरता आली कुठून? त्याचा खुलासा आता झाला आहे.

आफताब अमीन पुनावाला याने आपली प्रेयसी श्रद्धा हिची अत्यंत थरारक पद्धतीने हत्या केली आहे. या हत्येपूर्वी त्याने गुन्ह्यांसंदर्भातल्या अनेक वेबसिरीज आणि चित्रपट पाहिले, ज्यामध्ये अमेरिकी सिरीज डेक्स्टर हिचाही समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. आणि डेक्स्टर या वेब सिरीजवरुन प्रेरणा घेत त्याने हा खून केल्याचं समोर आलं आहे. खरंतर हा खून सहा महिन्यांपूर्वीचा आहे. आत्ता दिल्ली पोलिसांनी केवळ चारच दिवसांत त्याची पाळंमुळं खोदून काढली आणि हा प्रकार उघडकीस आणला.आरोपी आफताब मुंबईचा रहिवासी असून श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली. श्रद्धा आणि आफताब दोघे मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करायचे. ते डेटिंग अपच्या माध्यमातून मुंबईत भेटले होते. ते तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यानंतर ते दिल्लीला स्थायिक झाले. तिथे जाताच श्रद्धाने आफताबमागे लग्नाचा तगादा लावला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.या दोघांमध्ये याच मुद्द्यावरुन वारंवार भांडणं होत होती. एकेदिवशी आफताबला राग अनावर झाला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे १८ दिवस फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज वेगवेगळ्या जंगलामध्ये जाऊन टाकून दिले. अखेर सहा महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने