घृणास्पद प्रकरणानंतर इंस्टाग्राम ID ते जात...गूगलवर या गोष्टींचा सर्वाधिक सर्च

दिल्ली: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाने देशभऱ्यात खळबळ उडाली आहे. क्षणार्धासाठी हृदयाचे ठोके ठप्प पाडणाऱ्या या घटनेमुळे लोकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. लोकांनी गूगलवर या प्रकरणबाबत अनेक गोष्टी सर्च केल्यात. श्रद्धाचं इंस्टाग्राम अकाउंट ते गुन्हेगार पूनावाल्याचा धर्म आणि जात देखील गूगलवर टॉप ट्रेंड होतोय.अंगाला शहारे आणणारी ही घटना होती. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करत गुन्हेगाराने आठवडभर ते ३०० लीटर क्षमतेच्या फ्रिजमध्ये ठेवले. या प्रकरणाचा आता जसजसा उलगडा होतोय त्याप्रमाणे यूजर्स त्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी गूगलवर संबंधित बाबी मोठ्या प्रमाणावर सर्च करताय.गूगलवर सगळ्यात जास्त सर्च होताय या गोष्टी

यूजर्स गूगलवर या प्रकरणासंबंधित गोष्टी मोठ्या प्रमाणावर सर्च करताय. गुन्हेगार आफताबची इंस्ट्राग्राम आयडी ते त्याची जात आणि धर्म याबाबत लोक सर्वाधिक सर्च करताय. गूगलवर या गोष्टी टॉप ट्रेंडमध्ये दिसताय.गूगल ट्रेंडवर बघितल्यास यूजर्स Dexter टीव्ही सीरीजबाबतही सर्च करताय. या सीरीजपासून प्रेरणा घेत आफताबने निर्घृण हत्या केल्याचे सांगितल्या जातेय. यानंतर यूजर्स श्रद्धा वालकरची फेसबुक आयडीदेखील मोठ्या प्रमाणावर सर्च करताय.

ही घटना दिल्लीमध्ये घडली असल्याने दिल्लीतील यूजर्सकडून मोठ्या प्रमाणावर गूगल सर्च होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर गोवा, हरियाणा आणि उत्तराखंडमधूनही यूजर्स मोठ्या प्रमाणावर गूगल सर्चिंग करताय. आफताबचा धर्म आणि जात गूगलवर टॉप ट्रेंड ठरतोय. डेटिंग, लव-जिहाद आणि Dexter टीव्ही सीरीज या तिन गोष्टी गूगल सर्चवर सध्या टॉप ट्रेंडमध्ये दिसून येताय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने