मुंबई : भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्याशी लग्न करुन पाकिस्तानाता संसार थाटला होता. आता सानिया मिर्झाच्या वैवाहिक आयुष्यात खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन चाहत्यांना धक्कादायक माहिती दिली आहे.
सानिया मिर्झाच्या आयुष्यात वेगवेगळी वादळं घोंघावू लागली आहेत. शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटावर आता तिनं एक पोस्ट शेयर करुन आपल्या आयुष्यात काही आलबेल नसल्याचे म्हटले आहे. तिनं तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट शेयर करत ज्यांची मनं आता तुटली आहेत ते सगळे कुठे जातात, यासगळ्यांच्या समस्यांवर अल्लाहच मदत करेल. असे सानियानं म्हटले आहे. अशी पोस्ट करताच सानियाला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते सगळेजण देवालाच शोधायला निघाले आहेत. असे सानियानं म्हटले आहे.
त्या पोस्टपासुन सानिया आणि शोएब मलिकच्या आयुष्यात काही चांगलं चाललं नसल्याचे नेटकरी म्हणू लागले आहेत. यावरुन सानियाला तिच्या चाहत्यांनी देखील चांगलेच सुनावले आहे. भारत पाकिस्तान यामुळे ती पुन्हा ट्रोल देखील होऊ लागली आहे. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांच्या वैवाहिक आयुष्याला झाला आहे. त्या दरम्यान पहिल्यांदाच त्यांच्यातील बेबनावाच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे तिनं शेयर केलेल्या पोस्टवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात तणाव असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झा शोएबला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.