‘बिग बॉस’चा मोठा निर्णय, एकाचवेळी दोन सदस्य घराबाहेर जाणार, कोण आहेत ते स्पर्धक?

मुंबई :‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामधील स्पर्धकांमध्ये सध्या वाद, भांडणं सुरु आहेत. खेळ पुढे जात असताना स्पर्धकांमधील नात्यांची गणितंही बदलताना दिसत आहेत. अमृता धोंगडे व विकास मानेमध्येही आता जोरदार भांडण झालं आहे. घरातील वातावरण थोड्या फार प्रमाणत तापलं असताना ‘बिग बॉस’ने आता मोठा निर्णय घेतला आहे. या शोमध्ये आता एक नवा ट्विस्ट येणार आहे.‘बिग बॉस’ म्हटलं की नवा ट्विस्ट हा पाहिजेच. ‘बिग बॉस’ स्पर्धकांसाठी ट्विस्ट घेऊन येतात. 
आता तिच वेळ आली आहे. एकाच वेळी चक्क दोन स्पर्धक घराबाहेर जाणार आहेत. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये घरातील स्पर्धकही चिंतेत दिसत आहेत.“आता ‘बिग बॉस’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आपण त्वरित घरामध्ये लावण्यात आलेल्या आपल्या नावाच्या पाट्या काढून आणाव्यात. यातल्या दोन पाट्या या घरामध्ये नसतील. दोन सदस्यांचे एलिमिनेशन होणार आहे.” असं बिग बॉस या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.“आता ‘बिग बॉस’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आपण त्वरित घरामध्ये लावण्यात आलेल्या आपल्या नावाच्या पाट्या काढून आणाव्यात. यातल्या दोन पाट्या या घरामध्ये नसतील. दोन सदस्यांचे एलिमिनेशन होणार आहे.” असं बिग बॉस या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने