थोडीसी जो पिली है! पहिल्या धारेची पिऊन हत्ती टल्ली; जंगलात जाऊन...

ओडिशा: आपल्यापैकी अनेकांनी रत्याच्या कडेला दारू पिऊन सातवे आसमानवर गेलेल्या लोकांना पाहिले असेल. मात्र, माणसांच्या चुकीचा फटका कधी-कधी जंगातील प्राण्यांनाही बसत असतो.सोशल मीडियावर असे अनेक धक्कादायक प्रकारांबद्दल व्हिडिओ किंवा फोटो समोर येत असतात. असाचा काहीसा धक्कादायक प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल होणारा हा फोटो ओडिशाच्या जंगतील असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोनंतर अनेक नेटकऱ्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओडिशातील केओंझार जिल्ह्यातील पटना वन परिक्षेत्राच्या जंगलात काही हत्तींनी भांड्यात ठेवलेली कच्ची दारू पाणी म्हणून प्यायली. काहीवेळानंतर हे हत्ती टल्ली झाले आणि त्यांनी थेट खाली डोकं वर पाय करत यांनी थेट जमीन गाठली.या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच या सर्वांनी टांगा पलटी घोडे फरार होऊन गाढ झोपलेल्या हत्तींना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही केल्या हत्तींना जाग आली नाही. त्यामुळे अखेर गावकऱ्यांनी ही बाब वनविभागाच्या कानावर घातली.नेमकं काय झालं ?

त्याचे झाले असे की, ओडिसातील केओंझार जिल्ह्यातील शिलीपाडा गावातील ग्रामस्थांनी दारू बनवण्यासाठी महुआची फुले कुंडीत भिजवली होती. सकाळी गावकरी दारू बनवण्यासाठी पोहोचले असता त्यांना भांडी तुटलेली आणि त्यातील पाणी गायब झालेले दिसले. घटनेचा शोध घेतला असता गावकऱ्यांना काही अंतरावर २४ हत्ती जमिनीवर झोपलेले दिसले.

ढोल वाजवून केले जागे

पाणी पिऊन दारू पिलेल्या हत्तींना उठवण्यासाठी गावकऱ्यांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले मात्र, काही केल्या हत्तींना जाग येत नव्हती. अखेर येथील अधिकाऱ्यांनी शक्कल लढवत जोरजोरात ढोल वाजवून हत्तींना झोपेतून जागं केले.दरम्यान, हत्तीची आरोग्य तपासणी केली असता. दारूचा या हत्तींच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम झालेला आढळून आला नाही. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एक माकड लोकांकडून बिअर आणि दारूच्या बाटल्या हिसकावून ते पिताना दिसले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने