यूरोपियन संसदेकडून रशिया 'दहशतवादाचा प्रायोजक देश' घोषित

लंडन : यूरोपियन संघाच्या संसदेनं (EU) रशियाला 'दहशतवादाचा प्रायोजक देश' म्हणून घोषित केलं आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे.यूरोपियन युनियननं म्हटलंय की, रशियानं सैन्याच्या हल्ल्यांनी उर्जेची पायाभूत साधनं, रुग्णालये, शाळा आणि आश्रित नागरिकांच्या ठिकाण्यांवर हल्ले करत आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं आहे.

यूरोपियन संघाच्या संसदेचं हे पाऊल बऱ्याच अंशी प्रतिकात्मक आहे. कारण यूरोपियन संघाकडे हे प्रत्यक्षात आणण्यासाठी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. युरोपियन संघान यापूर्वीच युक्रेनवरील आक्रमणावरुन रशियावर मोठे प्रतिबंध लावले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि इतर देशांना आग्रह केला होता की, त्यांनी रशियाला 'दहशतवाचा प्रायोजक देश' म्हणून घोषित करावं.झेलेन्स्की यांनी रशियन सैन्यावर युक्रेनच्या नागरिकांना निशाणा बनवल्याचा आरोप केला आहे. युक्रेनचा हा आरोप रशियानं नाकारला आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटोनी ब्लिंकन यांनी आत्तापर्यंत काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात याबाबत प्रस्ताव आलेला असतानाही रशियाला दहशतवादाच्या प्रायोजित देशांच्या यादीत टाकण्यास नकार दिला आहे.अमेरिकेनं आत्तापर्यंत क्यूबा, उत्तर कोरिया, इराण आणि सीरिया या चार देशांचा दहशतवादाच्या प्रायोजक राष्ट्रांच्या यादीत समावेश केला आहे. याचा अर्थ असा की, हे देशांच्या संरक्षण विषयक निर्यातीवर प्रतिबंध आणि आर्थिक प्रतिबंध आणण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने