संरक्षण निर्यातीत भारताचे पाऊल पुढे

जोहान्सबर्ग : संरक्षण साहित्य उत्पादनात स्वदेशीवर अधिक भर देण्याबरोबरच भारत या क्षेत्रातील एक प्रमुख निर्यातदार देश म्हणूनही उदयाला येत आहे. मॉरिशस, मोझांबिक आणि सेशेल्स या देशांनी २०१७ ते २०२१ या कालावधीत त्यांच्या नौदल, लष्कर आणि हवाई अशा तिन्ही दलांसाठी भारताकडून संरक्षण खरेदी केली असल्याचे ‘इंडिया एक्झिम बँके’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.आफ्रिका खंडातील दक्षिणेकडील देश आणि भारत यांच्यातील वाढती भागीदारी या विषयावर आयोजित केलेल्या एका परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

अहवालानुसार, २०१७ ते २०२१ या कालावधीत भारताच्या एकूण संरक्षण निर्यातीपैकी ६.६ टक्के शस्त्र निर्यात मॉरिशसला, पाच टक्के मोझांबिकला आणि २.३ टक्के सेशेल्सला केली होती. भारत आणि आफ्रिकी देशांमध्ये सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.या अहवालात संरक्षण निर्यातीबाबतच्या सद्यस्थितीची माहिती देण्याबरोबरच भविष्यातील संधींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हवाई ड्रोनबरोबरच पाण्यातील ड्रोनच्या उत्पादनातही भारत आणि आफ्रिकी देश पुढाकार घेऊ शकतात, असे अहवालात सुचविण्यात आले आहे.भारताची संरक्षण निर्यात

(कोटी रुपयांमध्ये)

१५०० - २०१५-१६

१२,००० - २०२१-२२

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने