शालिन भानोतचं शिव ठाकरेने तोंड पकडलं, जोरात ढकललं अन्….; ‘बिग बॉस’च्या घरात हाणामारी,

मुंबई : बिग बॉस हिंदी’च्या घरात भांडण, वाद याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. अर्चना गौतम व शिव ठाकरेतील भांडणानंतर आता एमसी स्टॅन व शालिन भनोतमध्येही वाद झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं.एमसी स्टॅन व शालिन भनोतमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद सुरू झाला. टीना दत्ता बेडरुममधून बाहेर येत असताना तिच्या पायाला लागल्याने ती ओरडू लागली. तिचा आवाज ऐकताच शालिन किचनमधून टीनाकडे आला. टीनाचा पाय हातात घेऊन काय लागलं आहे, हे तो पाहत होता. पाय दुखत असल्यामुळे टीना पुन्हा ओरडू लागली. त्यानंतर बाजूलाच असलेल्या एमसी स्टॅनने शालिनला शिवीगाळ करायला सुरुवात केली. हे पाहून शालिनचा राग अनावर झाला आणि त्यानेही एमसी स्टॅनला शिवीगाळ केली. त्यानंतर एमसी स्टॅन व शालिनमध्ये जोरदार भांडण झाले.
एमसी स्टॅन व शालिनच्या भांडणात शिव ठाकरेने उडी घेतली. शालिन एमसी स्टॅनच्या अंगावर धावून जात असतानाच घरातील इतर सदस्यांनी त्याला पकडले. हे पाहून शिवचा राग अनावर झाला. “अंगावर धावून जायचं नाही”, असं म्हणत शिवने शालिनच्या चेहऱ्याला पकडून त्याला मागे ढकललं. त्यामुळे घरात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळलं. शिवने शालिन ढकल्यामुळे तो ट्रोल होत आहे.‘बिग बॉस’ची विजेती असलेल्या गौहर खानने याबाबत ट्वीट केलं आहे. “शिवने शालिनचं तोंड पकडून त्याला ढकललं. त्याचा हात शालिनच्या गळ्याजवळ होता. आता शिव शारीरिक हिंसा केल्यामुळे स्वत:ला घरातून बाहेर काढेल का? शालिनने काहीच चुकीचं केलं नाही. एमसी स्टॅन त्याला उगाच शिवीगाळ करत होता”, असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने घरातील भांडणाचा व्हिडीओ शेअर करत शिवला ट्रोल केलं आहे.‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व घरातील वादांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याआधी अर्चनाने शिवचा गळा पकडल्यामुळे तिला ‘बिग बॉस’ने खडे बोल सुनावले होते. आता बिग बॉसने हिंसा केल्याने बिग बॉस काय निर्णय देणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने