माणुसकीला काळीमा फसणारी घटना; मालमत्तेच्या वादातून वडीलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न

कोल्हापुर: कोल्हापुरात मालमत्तेच्या वादातून वडीलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वडील शौचालयास गेल्यानंतर बाहेरून रॉकेल टाकून त्यांना पेटवून देण्यात आलं. कागलच्या व्हन्नुर कोल्हापूर या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे.वडील आणि मुलाचा अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, मुलाने आपल्या बापलाच जीवंत जाळण्याचा निर्णय घेत त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. घराच्या जवळच असणाऱ्या शौचालयात वडील गेले असताना पाळत ठेवत मुलाने आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.वडिल शौचालयाच्या आत जाताच मुलाने आणि सुनेने बाहेरून कडी लावली. त्यानंतर खालून आतमध्ये रॉकेल टाकलं आणि काडी लावली. या घटनेमध्ये वडील देवोबा हजारे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सदर घटनेची माहिती मिळताच कागाल पोलिसांनी मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने