मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

मुंबई -‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या शोच्या पहिल्या भागापासूनच चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. पूर्वाची एक वेगळीच बाजू या शोमध्ये पाहायला मिळत आहे. आताही स्पर्धक विकास सावंतबरोबरचा तिचा कॅप्टन्सी टास्कदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मात्र विकास अपूर्वावर भारी पडला असल्याचं पाहायला मिळत आहे.मराठी कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये घरातील दोन्ही टीम कॅप्टनसीसाठी खेळताना दिसत आहे. यादरम्यान विकास आपल्या टीमसाठी अगदी जीव तोडून खेळताना दिसतो. टास्कदरम्यान अपूर्वा चक्क त्याच्या बराच वेळ अंगावर बसते. तरीही विकास काही ऐकत नाही.विकासचं टी-शर्ट खेचणं, त्याला ढकलणं, खाली पाडणं, अंगावर बसणं अशा कित्येक युक्त्या अपूर्वा या टास्करदरम्यान करते. विकास मात्र तिला काही ऐकत नाही. तो अपूर्वाशी सामना करत पुढे निघून जातो. विकासची ही खेळी पाहून त्याच्या टीममधील सदस्यही खूश होऊन त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये प्रेक्षकही विकासचं कौतुक करत आहेत. विकास तू मस्त खेळलास, विकास तू ग्रेट आहेस, विकास लय भारी, तू एकटाच भारी आहेस असं प्रेक्षकांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे. तसेच विकासला प्रेक्षक अधिकाधिक पसंती देताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने