विकीच्या लग्नात रंगलेलं मोठं भांडण, त्यादिवशी नेमकं काय झालं हे सांगताना अभिनेत्री म्हणाली...

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे गेल्या वर्षी लग्न झाले आहे. दोघांनी राजस्थानमध्ये अगदी शाही अंदाजात लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले.आपल्या लग्नाविषयी अनेकदा ते मुलाखतीतून बोलताना दिसतात. आता काही दिवसांपूर्वीच कतरिनानं सांगितलं की तिच्या आणि विकीच्या लग्नात कडाक्याचं भांडण झालं होतं आणि त्या दोघांना कळत नव्हतं ते काय सुरू आहे. त्यांच्या कानावर फक्त जोरजारात ओरडण्याचे आवाज येत होते. कतरिनानं कपिल शर्माच्या शोमध्ये याविषय़ी खुलासा केला आहेत्याचं झालं असं की कतरिनाजवळ कपिलनं तिच्या लग्नाचा विषय छेडला,तेव्हा त्याने विचारले की तिच्या लग्नात नवऱ्याचे शूज लपवण्याची प्रथा पार पडली होती का,जशी इतर लग्नात होते. तेव्हा अभिनेत्रीनं सांगितलं की तिच्या बहीणी आणि विकीच्या मित्रांमध्ये यावरनं कडाक्याचं भांडण झालं होतं.कतरिना म्हणाली,''मला माझ्या खोलीच्या मागच्या बाजूनं मोठमोठे आवाज कानावर पडत होते. जसं मी त्या दिशेने वळून पाहिलं. तेव्हा मला हे सगळे भांडताना दिसले,ते विकीचे शूज एकमेकांकडून खेचून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी अर्चना पूरणसिंगनं विचारलं की, 'जिंकलं कोण?' तेव्हा अभिनेत्री म्हणाली,''माहित नाही..मी स्वतः माझ्या लग्नात इतकी व्यस्त होते,यांचे भांडण सोडवायला कुठे जाऊ आणि जिंकलं कोण ते पहायला''. कतरिनाचं हे उत्तर ऐकून उपस्थित सगळेच हसू लागले.

माहितीसाठी सांगतो की कतरिना-विकीचं लग्न राजस्थानमध्ये सिक्स सेंस फोर्टला झालं होतं. लग्नात फक्त जवळचे कुटुंबिय आणि मित्र-परिवार उपस्थित होते. पुढील महिन्यातच दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असणार आहे. कतरिना आणि विकी विषयी बोलायचं झालं तर दोघांनी २ वर्षाच्या रिलेशनशीपनंतर लग्न केलं. दोघांनी कधी कुणाला याचा मागमुस लागू दिला नाही ही गोष्ट वेगळी. बातम्या मात्र अधनं-मधनं त्यांच्या रिलेशनशीपविषयी समोर यायच्या पण दोघांनी कधीही यावर स्पष्ट भाष्य केलं नव्हतं,ना आपलं नातं कबूल केलं होतं.

कतरिनाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तिचा 'फोनभूत' सिनेमा नुकताच रिलीज झाला. त्यानंतर लगेचच ती 'टायगर ३', 'मेरी ख्रिसमस', 'जी ले जरा' मध्ये दिसणार आहेत. 'टायगर ३' मध्ये सलमान खान आणि इमरान हाश्मिसोबतही कतरिना दिसणार आहे. 'मेरी ख्रिसमस' मध्ये ती साऊथ स्टार विजय सेतुपतिसोबत नजरेस पडेल. तर 'जी ले जरा' मध्ये आलिया भट्ट,प्रियंका चोप्रासोबत मोठ्या पडद्यावर ती दिसेल. माहितीनुसार कळत आहे की,'जी ले जरा' मध्ये तीन मैत्रिणींची कथा मांडण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने