“सगळ्या चित्रपटांचा…”; ऐंशी आणि नव्वदचे दशक गाजवणारे चार सुपरस्टार्स एकत्र

मुंबई : ऐंशीच्या दशकात अमिताभ बच्चन यांच्याबरोबरीने इतर अभिनेतेदेखील आपले निर्माण करत होते. संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि देओल सारखे रांगडे अभिनेते उदयास आले. या अभिनेत्यांनीचं ऐंशी नव्वदचं दशक गाजवल होतं. आता हेच अभिनेते आपल्याला पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहेत.सध्या बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मल्टिस्टार्टर चित्रपट येत आहेत. खान मंडळीदेखील एकमेकांच्या चित्रपटात झळकत आहेत.



अभिनेता संजय दत्तने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर ही एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात ४ दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती, सनी देओल, जॅकी श्रॉफ आणि स्वतः संजय दत्ता दिसत आहे. आपण मिथुन चक्रवर्तीच्या लूकबद्दल बोललो तर असे दिसून येते की अभिनेत्याने हाफ स्लीव्ह लेदर जॅकेट घातले आहे. या पोस्टरमध्ये सनी देओलचे केस वाढवलले दाखवले आहेत तर इतर कलाकारांचा लूकदेखील हटके वाटत आहे. तपकिरी जाकीट आणि काळा साधा टी-शर्ट आणि जीन्स असा संजय दत्तच लूक आहे. गळ्यात स्कार्फ. खाकी प्रिंट जॅकेट. जॅकी श्रॉफ हाय हिल्स लेदर शूज टपोरी लूकमध्ये दिसत आहे.सनी देओल नुकताच ‘चूप’ या चित्रपटात दिसला होता तर संजय दत्त ‘शमशेरा’ तर मिथुन चक्रवर्ती ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटात झळकले होते. जॅकी श्रॉफदेखील ‘फोन भूत’ चित्रपटात दिसला आहे. या फोटोवरून त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याबद्दल संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने