'आता मी पुन्हा लढेन'; जामीन मिळताच संजय राऊतांनी फोडली डरकाळी

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मात्र, कोर्टाने ईडीची ही याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान, राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
न्यायदेवतेवर पुर्ण विश्वास होता. न्यायदेवतेचे आभार मानतो. आता मी पुन्हा लढेन. आता मी कामाला पुन्हा मी सुरुवात करेन असा आत्मविश्वास राऊत यांनी जामीन मिळाल्या नंतर व्यक्त केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आज संध्याकाळीच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे मागील 100 दिवसांपासून तुरुंगात आहेत. विशेष कोर्टाच्या निर्णयाविरोधात ईडी आजच हायकोर्टात अपील करण्याची शक्यता आहे. विशेष कोर्टाने पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत या दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, ईडीला यामुळं मोठा धक्का बसला होता. ईडीनं या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडं केली होती. मात्र, कोर्टाने ही ईडीची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने