"भारतातल्या विविध राज्यांमध्ये G-20 परिषदेच्या बैठका होतील"; पंतप्रधानांची घोषणा

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-२० परिषदेसाठी बालीला गेले आहेत. भारत यंदा जी-२० परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी जी-२० परिषदेची भारताच्या अध्यक्षतेखालील भूमिका स्पष्ट केली आहे, तसंच महिला केंद्रीत विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "वैश्विक विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही. त्यामुळे जी-२० अजेंडामध्ये आपण महिला केंद्रीत विकासावर भर द्यायला हवा. यासोबतच शांतता आणि सुरक्षाही प्रदान करायला हवी. कारण त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञानाचे फायदे घेता येणार नाही. यासाठी जी-२० मध्ये काम करायला हवं."पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, "वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर ही तत्वाने भारत काम करत आहे आणि करेल. जी-२० परिषदेचं अध्यक्षपद भूषवणं हे भारतासाठी, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी हा विश्वास देतो की भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये जी-२० ची बैठक होईल. जेणेकरून सर्व देशांना भारतातल्या विविधतेची ओळख होईल आणि सगळ्यांनाच लोकशाहीची जननी मानल्या जाणाऱ्या भारताला समजून घेता येईल."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने