मोदी अन् सूनक पहिल्यांदाच भेटले! 'या' मुद्यांवर झाली चर्चा

दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या ऋषी सूनक यांची वर्णी लागल्यानंतर भारतात त्यांची बरीच चर्चा झाली होती. या सूनक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची G20 समिट या जागतीक परिषदेत पहिल्यांदाच भेट झाली. यावेळी या दोन्ही जागतीक नेत्यांमध्ये काही काळ चर्चाही झाली. पंतप्रधान कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे.
पीएमओच्या माहितीनुसार, बाली इथं होत असलेल्या G20 समिटच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये चर्चाही पार पडली. या दोन्ही नेत्यांशिवाय चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मायक्रॉन यांनी देखील या समिटला भेट लावली.दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान सूनक यांची पहिल्यांदाच समोरासमोर भेट झाली. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात या दोघांची फोनवरुन चर्चा झाली होती. यावेळी भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर त्यांच्यात संवाद झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने